वेग वेगळी मन, जगावेगळी नाती,
तुटला विश्वास एकदा, कि होतात मन कोती...
मैत्री मध्ये कधी कधी,
होतात भांडण छोटी मोठी,
बाहेर खूप चिडलो तरीही मानात्न असतात खोटी,
अशी मैत्री फक्त एकदाच होते
झालाच भांडण तर स्वताला सांभाळून घेते ,
पुन्हा एकदा त्यांच्या सुरु होतात भेटी ...
वेडे ते दोघ, त्यांना कळत नसत..
कारण या तर असतात रेशीमगाठी
आयुष्यातले काही वळण तो चुकून जातो,
तिचा विचार करयला विसरून जातो
ती रुसते , खूप दुखावल्या जाते ..
तो तिला खूप समजावतो पण ...
पण फुटक्या नशिबाच वाडग त्याच्या वाट्याला येते!
त्याला अजूनही तिचीच वाट असते ,
आशेच्या भरवशावर तो
पुन्हा एकदा घर बांधतो
पण तिच्या आयुष्यातली वाट,
आता त्याच्या कडे वळणार नसते,
आयुष्याच्या शेवटा पर्यंत,
तो तेवढ्याच आशेन तिची वाट बघत असतो,
ती तेवढ्याच ठाम पाने त्याच्या विश्वासाला नाकारते,
त्याच आशेच घर,
शेवटी विश्वास घाताच्या आगीत जाळून खाक होत,
तो जातो, तीही जाते ...
आणि एक सुंदर मैत्रीच गोजिरवान घर,
काळाच्या ओघात, अंताच्या दिशेन वाहून जात!
Comments
Post a Comment