भेटायला बोलावताना थोड लजल्या सारख झाल,
पण नाशिबातली भेट, त्यामुळे तुला टाळता नाही आल,
तू नेहेमी म्हणतेस गम्मत करू नकोस नहीं तर पाय घसरेल,
मी खुप प्रयत्न केले पण माला काय माहिती माझ मन मला फसवेल,
अगदी आसुसलेल मन घेऊन तुला भेटायला आलो,
तूला यायला उशीर झाला तर तुला डोळ्यात तेल घालून शोधत राहिलो,
तू अगदी अनाहूत पणे समोर उभी राहिली,
जस काही त्याने माझी आर्त हाक ऐकून एकाएकी स्वर्गातली अप्सराच धाडली,
तुझ्या डोळ्यात बघण्याची हिम्मत नव्हती,
पण मन हे माझ वेड, पण माझी दृष्टी थेट तुझ्या त्या सागरसारख्या नयनांना भिडली,
खूप कष्टाने मी स्वतःला आवरल,
पण विचारांची भाषा, शेवटी ती माझ्याशी बोलली,
आणि मनोमन मी तुला हृदयाशी घट्ट कवटाळल,
तुझ्या मैत्रिणीची बोलतांना सुधा तूच समोर होती,
का कुणास ठाऊक, तुझ्यासाठी काही शब्द सुचले,
पण त्यांना वाट मिळायला माझी वाचा माझ्या सोबत नव्हती,
कां अस होत कि झालेली भेट कधी तरी संप्वावीच लागते,
पण ती आठवण एक अविस्मरणीय अनुभव म्हणून जन्मभर सोबत चालते,
कां अस होत, कि तुझा आवाज हवाहवासा वाटतो,
कदाचित त्यात काही जादूच असेल,
कारण एकांतात असताना, फक्त तोच अभासतो,
जगताना बरेच लोक आपल्याला कायमचे सोडून जातात,
पण तू निरोप देते म्हंटल्यावर, एक छोटासा पाण्याचा थेंब डोळ्यात साठतो,
आपण भेटलो, बोललो, भेट अगदी छान झाली,
पण तरीही निरोप देताना जाणवलं कि इच्छा अपूर्णच राहिली,
कदाचित मानवी इच्छांना कां अंतच कधी नसतो,
त्या अंताला सुधा माहिती नसत, त्याचा शेवट कुठे असतो,
तुझ्या जगण्याच्या प्रवासातल्या काही क्षणांना मी चोरून घेतल,
सांभाळून त्यांना मी माझ्या आयुष्याच्या शिदोरीत लपवलं,
आपल्या प्रवासाच्या पुढच्या भेटीत मला माहिती नाही,
पण तुझ्या सहवासात घालवलेल्या त्या,
काही क्षणात मी माझ पूर्ण आयुष जागून घेतलं...!!!!!
Comments
Post a Comment